आपल खान्देश

मनमाडला 26 नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन साजरा करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न


 नांदगाव ( प्रतिनिधी – मुक्ताराम बागुल ) – नांदगाव तालुक्यातील अमर शहरांमध्ये असोसिएशन कलयात ‘ सविधान गौरव दिन ‘ साजरा करण्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संविधान गौरव दिन 26 नोव्हेंबर 2021 रोजी साजरा करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

 यावेळी कार्यक्रम यशस्वी होईल याविषयी बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांनी आपली मते मांडली. संघटन अधिकाधिक मजबूत होण्यासाठी चर्चादेखील करण्यात आली.

 तसेच मा. मीनाजी ( ADRM सर ) भुसावळ मंडळ, भुसावळ,मनमाड येथे भेटीसाठी आले असता ऑल इंडिया एससी / एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओ /ला शाखेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. व रेल्वे कामगारांच्या समस्येविषयी निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये रेल्वेचे रुग्णालय दिवसा चालू असते पण रात्रीच्या वेळेस बंद असल्या कारणाने नाईट शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतात जर एखादा कर्मचारी अपघातग्रस्त झाला तर त्याला वेळीच उपचार मिळत नाही म्हणून रेल्वे रुग्णालय रात्रीच्या वेळेस सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष सम्राट गरुड, सचिव चेतन डी जगताप, सहसचिव सौ. दिपाली बी लोंढे, सहसचिव राहुल केदारे आदी पदाधिकारी तसेच सन्माननीय कॉमेडी मेंबर दीपक बागुल, मंगेश चव्हाण, आकाश शिंदे,, विकी आहिरे, अंबादास मोरे, सागर बिडवे, भीमराज धिवर, आदींची या बैठकीला उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे