आपल खान्देश

जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होणार; एकनाथ खडसेंचा आत्मविश्वास

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार असूनही भाजपा पराभवाच्या भीतीने पळ काढत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. २१ पैकी २१ जागा आमच्या येणार असून महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल, असे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. ते यावेळी मुक्ताई नगर येथे बोलत होते.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या ९ मतदारसंघातील १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १७ पैकी १० जागांसाठी आज मतदान होत आहे. १७ पैकी ७ जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित १० जागांसाठी आता २० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

मुक्ताई नगर येथे मतदान केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका केली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सहकार पॅनल स्थापन केले आहे. या पॅनलमधील ११ जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाकडे दिग्गज उमेदवार होते. मात्र, आपला पराभव डोळ्यांसमोर दिसताच भाजपाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेत पळ काढला. उर्वरित १० जागांसाठी आज मतदान होत आहे. या १० जागाही आम्हालाच मिळतील आणि आघाडीचाच अध्यक्ष होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे