आपल खान्देश

अलर्ट : पुढील ४ दिवस खान्देशासह महाराष्ट्रात पावसाची शक्यता, जळगावात झाला पाऊस!!

धुळे (झूम मराठी वृत्तसंस्था) हवामान खात्याने गेल्या आठवड्यात दिलेल्या अंदाजानुसार राज्यात ठीक ठिकाणी आज पावसाला सुरुवात झाली असून जळगावात पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश नसला तरी जळगावात पाऊस पडला .

हवामान खात्याने यापूर्वीच राज्यात येलो अलर्ट जरी केले होते. राज्यातील काही भागात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस होणार असल्याने प्रशासनातर्फे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २ दिवसांपासून राज्यात थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी आजपासून ४ दिवस विजांच्या गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे