आपल खान्देश

पाचोरा बालाजी रथोउत्सव मिरवणूक न काढता जागेवर रथाची पुजा होणार

पाचोरा श्री. बालाजी महाराज यांची रथयात्रा दरवर्षी कार्तिक १४ (चतुर्दशी) रोजी आयोजित करण्यात येत असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर २०२१ गुरुवार रोजी येणारी रथयात्रा रद्द करण्यात आला आहे.

मिरवणूक न काढता जागेवर रथाची पुजा करण्यात येणार आहे.श्री. बालाजी महाराज यांची रथयात्रा दरवर्षी कार्तिक १४ (चतुर्दशी) रोजी आयोजित करण्यात येत. या दिवशी यात्रेचे नियोजन नसल्याने कोणत्याही प्रकारची दुकाने अथवा फिरत्या विक्रेत्यांनी स्टॉल लावु नये असे आवाहन श्री. बालाजी मंदीर संस्थान पाचोरा यांचेमार्फत करण्यात आले आहे.१८ नोव्हेंबर २०२१ गुरुवार रोजी नेहमी प्रमाणे रथाची सजावट करण्यात येणार असुन श्री. बालाजी महाराज रथाची पुजा, आरती व इतर धार्मिक विधी बालाजी मंदीराचे परिसरात सोशल डिस्टशींगचे पालन करुन करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी शासनाचे निर्देशाचे पालन करावे असे आवाहन विश्वस्त श्री. बालाजी मंदीर संस्थान पाचोरा व सयाजी पाटील परिवार यांचेमार्फत करण्यात येत आहे. बालाजी महाराज पुजा यशवंत राजाराम पाटील व त्यांच्या पत्नी आशा यशवंत पाटील यांचा हस्ते करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे