आपल खान्देश

पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर निकृष्ट!

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत, अशी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

झूम मराठी न्यूज वेब मीडिया 

पुणे, 11 एप्रिल : महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी  समोर आली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत तक्रार केली आहे.

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत, अशी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारकडूनच ससूनला व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र हे व्हेंटिलेटर बंद पडत असल्याने निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार असल्याने केंद्र सरकार राज्यावर अन्याय करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे केंद्राकडून आरोग्य सुविधा पुरवताना कचराई करण्यात येत आहे, असंही या नेत्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे या आरोपांवर केंद्र सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे