आपल खान्देश

Dondaicha | दोंडाईचा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाचा दिमाखात लोकार्पण सोहळा.

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया @ दिलीप जय परदेशी 

दोंडाईचा (झूम मराठी) दोंडाईचा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक उदघाटनाच्या प्रतिक्षेत होते आणि आज मोठया दिमाखात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा मान्यवारांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी’ म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या महाराणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवडे नगर परिषदेच्या आयोजीतआमदार जयकुमार रावल यांच्या स्थानिक विकास निधीतून राणीपुरा होळी चौक याठिकाणी मातृत्व चौक सुशोभीकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, माजी खासदार डॉ विकास महात्मे, आमदार महादेव जानकर, इंदोर संस्थानचे स्वप्नील होळकर , माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार रमेश शेडगे, तळोदा संस्थानचे अमरजितराजे बारगळ, डॉ. शशिकांत तरंगे, धनगर समाज नेते गणेश हाके, दोंडाईचा न प मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, सभापती महावीर सिंग रावल, नगरसेवक प्रदीप कगणे, नंदुरबार जिल्हा धनगर समाज अध्यक्ष आनंदा कुवर, धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत बनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, मेंढपाळ नेते विठ्ठल मारनर, अॕड शितल चिंचोरे, पत्रकार सुनिल धनगर, धुळे जिल्हा अध्यक्ष  अॕड ज्ञानेश्वर पाटील, धुळे जिल्हा ग्रामिण अध्यक्ष चुडामण पदमोर व अनेक धनगर सामाज बांधव मेंढपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे