पाचोरा लाईव्ह- प्रसिद्ध बिल्डर दिवसा ढवळ्या चोरी करतोय वीज, महावितरण कारवाई का करत नाही?
सामान्य नागरीकानी वीज बिल नियमित भरावी आणि उद्योजकांनी फुकट वीज वापरावी हा कुठला न्याय आहॆ.
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा शहरात वीज चोरी पकडल्या जाताय त्यावर दोन ते दीड लाख दंड म्हणुन कारवाई होत आहॆ, आणि एकीकडे प्रसिद्ध तुलसी इन्फ्रा आणि उदांतिका कनस्ट्रकशनचे उद्योजक दीपक वाघ हे खुले आम आकडा टाकून वीज चोरी करत आहॆ. सदर उद्योजकाला कोणाचा आशीर्वाद आहॆ? असे येणारे जाणारे सामान्य नागरिकांना प्रश्न पडत आहॆ.
पाचोरा शहरातील उद्योजक उदांतिका बिल्डर ह्यांच्या जुना अंतुर्लीरोड वरील सर्वे नंबर 32/1 या प्लॉट वर आठ घरांचा बांधकाम साईड गेल्या वर्षभरापासून चालू आहॆ तेथे घराला भरमसाठ पाणी मारण्यासाठी बोरिंगच्या मोटरी व बांधकामासाठी कटर मशिन्स चालविण्यासाठी चक्क वीज तारेवरून खुले आम आकडा टाकून वर्षभर वीज चोरीचा कार्यक्रम सर्रास पणे कोणाच्या आशीर्वादाने चालत आहॆ? येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरीकाना प्रश्न पडतोय.
राज्यत विजेचा तुटवडा असून सामान्य व्यक्ती व शेतकरी यांना वीज भरायला लावताय आणि सदर विकासक आपली विकासकामे फुकटची वीज वापरून गेल्या एक वर्षापासून आपलं वीज विजेच्या खांब्यावरून आकडा टाकून वीज चोरी करतोय हे वीज कर्मचारीयांना माहित नसावे का असा प्रश्न पडल्या अखे्रीज राहत नाही. सामान्य नागरीकानी वीज बिलभरायची आणि उद्योजकांनी फुकट वीज वापरावी हा कुठला न्याय आहॆ? याची चौकशी झालीच पाहिजे. नियमा नुसार त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.


