आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

माझ्यावर आरोप सिद्ध करा अन्यथा आमदारांनी राजीनामा द्यावा – अमोल शिंदे

हिवाळी आदिवेशानात आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा बाजार समितीच्या जप्त केलेल्या जागेच्या  व्यवहारा विषयी प्रश्न उपस्थित केला आणि त्यात माझा सबंध असल्याचे आ. किशोर पाटील यांनी आपल्या फेसबुकपेज वर पोस्ट केली, त्यात माझा सबंध सिद्ध केल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे भाजपचे अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अन्यथा किशोर पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे म्हणाले की, जागेचा ताबा निकाल लागल्यापासून तीनवेळा तहसीलदारांनी लांबवला. मात्र अंतिम तारीख २० डिसेंबरला कोर्टाच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी कामकाज केले. त्यावेळी आ. किशोर पाटील यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून खोटी माहिती दिली. अद्यापपर्यंत जागेच्या ताबा हस्तांतरण करण्यास स्थगिती किंवा ‘जैसे थे’ स्थितीबाबतचा आदेश आणलेला नाही तेव्हा चुकीची माहिती देऊन मंत्र्यांना या तहसीलदारांवर कारवाई करण्याची घोषणा करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

आ. किशोर पाटील यांच्याच नेतृत्वातील बाजार समिती सत्तेत असताना सन २००८ साली कर्ज घेतले. ते अद्याप बँकेस फेडले नाही. ते फेडण्यासाठी पाचोरा, भडगाव, कजगाव येथील जागा विक्री केल्या. मात्र कर्ज फेडले नाही व ९ वर्षांपासून सत्तेत असूनही शासनाकडून, पणन कर्जफेडीसाठी का प्रयत्न केले नाहीत. आ. किशोर पाटील हे दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे