ब्रेकिंग
बहुजन मुक्ती पार्टी तर्फे वाढत्या वीज तोडणी बंद करण्यासाठी लाईट बिल जलाओ आंदोलन
बहुजन मुक्ती पार्टी तर्फे वाढत्या वीज तोडणी बंद करण्यासाठी लाईट बिल जलाओ आंदोलन
जळगाव -( प्रतिनिधी) आज राज्य सरकारने थकीत वीज बिल माफ करून वीज कनेक्शन कापणे व वीज पुरवठा खंडित करणे तत्काळ थांबवावे यासाठी बहुजन मुक्ती पार्टी तर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर वीज बिल प्रति जाळून निषेध नोंदवण्यात आला व आघाडी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर वीज बिल संदर्भात वीज बिलाच्या आकारणीच्या संदर्भात, वीज मोफत देण्याच्या संदर्भात एकही शब्द बोलताना दिसत नाही उलट ग्राहकाची मोठा प्रमाणात वीज बिल आकारून ग्राहकाची आर्थिक लूट ही आघाफी सरकार करत आहे ह्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टी वीज बिल जालाओ आंदोलन केले जर आघाडी सरकारने वीज बिल संदर्भात ठोस पाऊल न घेतल्यास तर येणाऱ्या20 तारखेला संपुर्ण महाराष्ट्र भर जेल भरू आंदोलन करण्यात येणार आहे व 7 डिसेंम्बर रोजी वीज मंत्री यांच्या घराला घेराव घालणार आहे आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर वीज बिलाच्या प्रति जाळून निषेध नोंदलवला या प्रसंगी मा.अमजद रंगरेज (जिल्हाध्यक्ष),विजय सुरवाडे(जिल्हामहासचिव),राजू भाऊ खरे(जिल्हासयोजक बहुकन क्रांती मोर्चा),डॉ शकिर शेख(जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा),मा.सुनीलभाऊ देहडे(शहर संयोजक),मा.सुकलाल पेंढारकर(तालुकाध्यक्ष) तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




