आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या चालू वर्षासाठी निवड झालेल्या कार्यकारिणीचा केला सत्कार
पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या सन २०२१-२२ साठी निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला पाचोरा आज रोजी शिवतीर्थ कार्यालय येथे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
नवनिर्वाचित कार्यकारिनीत अध्यक्ष श्री.सुभाष शेठ अग्रवाल, उपाध्यक्ष:- श्री.पप्पु शेठ मोर, सचिव:- श्री.पारस मुणोत, सहसचिव:- श्री.सचिन येवले, यांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पुष्प गुच्छ देवून सन्मानित केले. व असोसिएशन च्या बळकटीसाठी तसेच भावी वाटचालीसाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात
त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गोहील , माजी उपनगराध्यक्ष श्री.शरद भाऊ पाटे, श्री.विष्णु आण्णा चौधरी, शाकीर बागवान, सतिष चौधरी, स्वीय सहाय्यक राजु भाऊ पाटील तसेच मोठ्या प्रमाणात सेना युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




