सावधान हा खड्डा तुमच्या जीवावर बेतू शकतो!!.
पाचोरा – पाचोरा शहरातील मुख्य मार्गात येणारा रेल्वे भुयारी मार्गातील एक खड्डा त्या खड्याचे लोखंडी आसारी दिसू लागली आहेत! म्हणजेच त्या रोडाचा सापळाच दिसत आहे, तो खड्डा दुचाकी चालकाचा बळी घेतल्या शिवाय पाचोरा नगरपालिका प्रशासन त्याला भरू शकणार नाही का?? असा प्रश्न प्रवास करताना चालकांना येत आहे.
पाचोरा शहरातील महत्वाचा मार्ग म्हणजेच रेल्वे भुयारी मार्ग त्या भुयारी मार्गच्या किती तरी अडचणी आहेत. भुयारी मार्गातील रोडावर नेहमी पाणी साचलेले असते, पाण्यातुन आपला तोल कसा बसा सावरता सावरता चालकाच्या नाकेनऊ येत असते आणि मधेच अरुंद रोडावर एक भला मोठा खड्डा त्या खड्याचे लोखंडी आसारी दिसताच त्याला चुकवन्याचा प्रयत्न दुचाकी चालक करत असतो ह्या प्रयत्नात जर का एखाद्याचा बळी गेला तर??अपघाताची जबाबदारी कोणावर निश्चित करणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे, पाचोरा पालिका प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे.
प्रशासनाने दखल घेऊन त्याठिकाणचे खड्डे बुजविले पाहिजेत अशी मागणी ‘झूम मराठी न्यूज’ पाचोरा नगरपालिकेला करत आहे. रोज एक दोन दुचाकी चालक या मार्गतून प्रवास करत असताना खाली पडल्या शिवाय राहत नाही. खाली पडल्या शिवाय न म्हणता नतमस्तक होत असतात..
रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे शारीरिक त्रास, वाहतूक कोंडी, प्रवासाची वेळ लांबणे या समस्या, तर निर्माण होतातच. पण त्याचबरोबर अनेकदा हे खड्डे जीवावर सुद्धा बेततात. या खड्ड्यांमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात अनेक दुचाकीस्वारांनी आपले प्राण गमावले आहेत. सोमवारी तामिळनाडू चेन्नईमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा रस्त्यावरच्या छोट्याशा खड्डयाने बळी घेतलाय.



