ब्रेकिंग

पर्यावर पूरक दिवाळी – नैसर्गिक पद्धतीने बनवलेले कंदील, मातीचे दिवे खरेदी करण्यास प्राधान्य द्या पाचोरा नगरपालिकेच्या वतीने नागरिकानां आवाहन

  • नैसर्गिक दिव्यांचा वापर करा

दिवाळीला मातीपासून तयार केलेल्या पणत्या वापरणे ही पूर्वंपार चालत आलेली पद्धत. परंतू, अलिकडी काही काळात विविध धातू किंवा प्लॅस्टिक अथवा भेसळयूक्त मिश्रणातून तयार केलेल्या पणत्याही बाजारात आल्याचे पाहायला मिळते. अशा पणत्यांमधून दिवे लावणे कटाक्षाने टाळा. दिवे लावण्यासाठी शुद्ध मातीच्याच पणत्या वापरा. जेणेकरुन कोणतीही दुर्घटना घडणार नाही.

  • नैसर्गित वस्तूंपासून तयार केलेले आकाश कंदील वापरा

आज बाजारात विविध पद्धतीचे आकाश कंदील उपलब्ध आहेत. यात पारंपरीक कागद आणि बांबूच्या कामठ्यांपासून बनवलेल्या कंदिलांपासून प्लॅस्टिक आणि थर्माकॉलचा वापर केलेले कंदील पाहायला मिळतात. पण, आपण कटाक्षाने साधा कागद आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेले कंदीलच खरेदी करण्यास प्राधान्य द्या. प्लॅस्टिक, थर्माकॉल आदिंचा वापर केलेले कंदील वापरु नका. असे केल्यानेही आपली दिवाळी Eco Friendly पद्धतीने साजरी होईल.

  • प्लॅस्टिक पिशवीचा आग्रह टाळा

दिवाळी सणांमध्ये खास करुन खरेदी आणि फराळाचे पदार्थ देवाणघेवाण करताना लोक प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतात. परंतू, हा आग्रह कटाक्षाने टाळा. दिवाळी फराळ देताना तो कागदी किंवा कापडी पिशवीतच द्या. दुकानातूनही मिठाई, कपडे अथवा इतर वस्तुंची खरेदी करताना कापडी अथवा कागदी पिशवीचाच आग्रह धरा. प्रत्येकवेळी खरेदी करताना प्लॅस्टिक पिशवी वापरल्याने घरामध्ये प्लॅस्टिक अनावश्यक पद्धतीने वाढते. या पिशव्या पुढे कचऱ्यातच जातात. त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते.

  • फटाके फोडताना काळजी घ्या

खरे तर दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. त्यामुळे फटाके वाजवूच नये. परंतू, जर ते वाजवणार असाल तर वेळ आणि जागेची काळजी घ्या. रहदारी, गर्दी, ज्वलनशील पदार्थ ,वस्तू, केंद्र असलेल्या ठिकाणी फटाके फोडू नका. तसेच, रुग्णालयं, शाळा, हौसिंग सोसायट्या, पाळणाघरं, सरकारी कार्यालयं, धार्मिक ठिकाणं अशा ठिकाणी फटाके फोडू नका. अती तीव्रतेचे, अधिक धूर निघणारे फटाके फोडू नका. ज्यामुळे वायूप्रदुषणात वाढ होईल. शक्यतो कमीत कमी फटाके फोडा. आणि हो.. कोणतीही हानी होणार नाही याची शक्य तितकी काळजी घ्या. फटाके फोडून झाल्यावर त्या ठिकाणी जमा झालेले फटाक्याचे कागद, रसायनं एकत्र गोळा करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे