आपल खान्देश

जळगाव जिल्ह्यातील ग स सोसायटीचा निकाल त्रिशंकू?

झूम मराठी

जळगाव : ग.स. सोसायटीच्या 21 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही पॅनलला बहुमत मिळाले नसून प्रगती पॅनलने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारल्याने सत्तेची चावी या पॅनलच्या हाती आल्याचे दिसून येत आहे. सहकार पॅनलला सर्वाधीक नऊ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी आवश्यक असणार्या दोन जागा त्यांना कमी पडल्या आहेत तर त्यांना आव्हान देणार्या लोक सहकार पॅनल व प्रगती पॅनल यांना प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे ग.स.सोसायटीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

ग.स. सोसायटीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात चुरस दिसून आली. यात २१ जागांसाठी पाच पॅनलच्या माध्यमातून तब्बल ११५ उमेदवार उभे असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शनिवार दि. ३० एप्रिल रोजी कबईचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. पहिल्यांदा मतमोजणी वेगाने होईल असे मानले जात असताना सुरवात संथ गतीने झाली. मात्र मतमोजणी अगदी पहाटे उशीरापर्यंत चालल्याने अतिशय आळसावलेले वातावरण दिसून आले. यातच विविध फेऱ्यांमधून कधी कुणी आघाडीवर तर कुणी पिछाडीवर जात असल्याने थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रात्री आठ वाजेपासूनच ग. स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे