ब्रेकिंग

धक्कादायक – शेवगाव मध्ये एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या

कालपासून सुरू असलेलं एसटी बंद आंदोलन हे मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आज शुक्रवारी लगेच शेवगाव आगारात दिलीप हरिभाऊ काकडे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे

शेवगाव मध्ये एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या एकीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ, आणि घरभाडे भत्ता वाढ आदी मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू झाल्या नंतर राज्य शासनाने यातील काही मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे झालेले असतानाच आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या मागील बाजूस असलेल्या शीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आलेआहे.

शेवगाव मध्ये एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या दिलीप हरिभाऊ काकडे हे महाराष्ट एसटी कामगार संघटनेचे सदस्य असल्याचे कळते.त्यांचे वय 56 असून त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक माहिती भेटली नाही. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नसल्याचे समजते. या घटनेमुळे शेवगाव आगरात आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील विविध एसटी महामंडळाच्या संघटनेची मुख्य मागणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी आहे, ही मागणी सध्या मान्य करण्यात आलेली नाही. मात्र महागाई भत्यात 28 वाढ, घरभाडे भत्ता यामध्ये शासनाने वाढ केली असून यामुळे राज्य सरकारवर 30 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. शासन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या तडजोडीनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर कालपासून सुरू असलेलं एसटी बंद आंदोलन हे मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आज शुक्रवारी लगेच शेवगाव आगारात दिलीप हरिभाऊ काकडे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे