आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा शहरात डॉ भूषण मगर-पाटील फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा शहरात डॉ भूषण मगर-पाटील फाउंडेशन पाचोरा आयोजित आज एस. एस.महाविद्यालय पाचोरा येथील सभागृहात “संवाद तरुणाईशी वेध भविष्याचा” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला होता.

यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची पध्दत, येणा-या अडचणी, त्याचे निराकरण आणि लक्ष प्राप्ती बाबत मागदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचोरा प्रांतधिकारी मा.विक्रम बांदल, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषणदादा मगर, जळगांव येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अनिलचंद्र सुर्वे सर, प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.वासुदेव वले उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा.माणिक पाटील तर आभार प्रदर्शन भोसले सर यांनी मानले.

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ?

अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात!

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे