कुऱ्हा येथील कोविड सेंटर साठी रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी स्व खर्चातून 30 बेड उपलब्ध करून दिले.

Dileep_Pardeshi@zoommarathinews # 26 April 21
देशात व महाराष्ट्रात सध्या कोरोना प्रचंड वेगाने वाढत असुन मुक्ताईनगर तालुक्यात सुद्धा दररोज रुग्ण संख्या वाढतच आहे मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर मध्ये आजूबाजूच्या तालुक्यातील लोक सुद्धा उपचारासाठी भरती होत असल्यामुळे मुक्ताईनगर येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे सध्या वाढती रुग्णसंख्या बघता मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर अपुरे पडत आहे
हि बाब लक्षात घेऊन, कुऱ्हा काकोडा येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले होते कोविड सेंटर साठी लागणारे साहित्य लोकसहभागातून उपलब्ध करून देण्याची तयारी सुध्दा दर्शवली होती तद्नंतर तहसीलदार यांनी आदिवासी आश्रमशाळा कुऱ्हा येथे पाहणी करून तेथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी मान्यता दिली असुन लवकरच कोविड सेंटर सुरू होता आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी स्व खर्चातून 30 बेड उपलब्ध करून दिले आहेत
आणि अजून आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच कुऱ्हा परिसरातील दानशूर व्यक्तींनी आपल्याला शक्य ती मदत करावी असे आवाहन केले आहे .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा