आपल खान्देश

मांजरीला बंदुकीने केलं ठार! कारण मांजरीच्या पिल्लाने कोंबडीचे पिल्लू खाल्ले

मांजरीच्या कपाळावर गोळी लागल्याने मांजरीचा तडफडून मृत्यू झाला. सदर माथेफिरु विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे प्राणी प्रेमींनी या घटनेचा निषेध केला असून त्या व्यक्तीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

मांजरीने कोंबडीचे पिल्लू पकडून खाल्ले आणि त्याचा राग आला म्हणून त्या मांजरीला बंदुकीच्या गोळीने ठार केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे.

गिरणा पंम्पिंग भागात राहणाऱ्या हेमराज सोनवणे यांनी कोंबडीचे पिल्ले पाळली होती. शेजारी असलेल्या पुष्कराज बानाईत यांनी पाळलेल्या मांजरीने कोंबडीचे पिल्ले पडकून मारले. त्याचा राग आलेल्या हेमराज ह्याने घरातील छऱ्याच्या बंदुकीने नेम धरून मांजरीला मारले, मारल्याचा व्हिडीओ बानाईत ह्यांनी काढला आहे. या प्रकरणी पुष्कराज बनाईत यांच्या तक्रारी वरून हेमराज सोनवनेला पोलिसानी ताब्यात घेतलं आहे.

हेमराज हा फोटोग्राफर आहे वन्यजीव सदस्य असल्याचं सांगतो, भटक्या जखमी कुत्र्यांना सांभाळत असल्याचं बोललं जातं. मात्र, प्राण्यावर प्रेम करणारा असा क्रूर कसा होऊ शकतो असा प्रश्न आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे