ब्रेकिंगमहाराष्ट्र
ठाण्यात कोविड लसीकरण प्रकिया विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन.
कोविड लसीकरण प्रकिया विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन कारण्यात आले
शरण खन्ना -ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे -दि २० ऑक्टोबर : ठाण्यातील कोरोणा संक्रमण आटोक्यात आणण्याकरता करण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत विशिष्ट हेतूने लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून त्याविरोधात ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिका मुख्यालयासमोर””धरणे आंदोलन”” करण्यात येत आहे.यामध्ये ठाणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शैलेश शिंदे , ब्लॉक अध्यक्ष अभिजित पांचाळ, महिला अध्यक्ष शिल्पा सोनाने,सरचिटणीस सचिन शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी,ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, महेंद्र म्हात्रे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.




