गुन्हेगारी

बँकेची 4 कोटी 59 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दुय्यम निंबधक नंदुरबार व तत्कालीन सर्व तलाठी विरुद्ध गुन्हा दाखल

बँकेची 4 कोटी 59 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पती पत्नी सह तत्कालीन सर्व दुय्यम निंबधक नंदुरबार व तत्कालीन सर्व तलाठी नंदुरबार यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नंदुरबार येथील युनियन बँक ऑफ इंडीयाच्या शाखेत मालमत्ता तारण ठेवुन सदर तारण मालमत्ता बेकायदेशीरपणे इतरांना विक्री करुन बँकेची 4 कोटी 59 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पती पत्नी सह तत्कालीन सर्व दुय्यम निंबधक नंदुरबार व तत्कालीन सर्व तलाठी नंदुरबार यांच्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील युनियन बँक ऑफ इंडीयाच्या घी बाजार शाखेत सन 2008 ते सन 2018 पर्यंत संशयीत आरोपी रविंद्र काशिराम मराठे, सुरेखा रविंद्र मराठे दोन्ही रा – महाराष्ट्र व्यायाम शाळा, नंदुरबार यांनी त्यांची मालमत्ता युनियन बँक ऑफ इंडीया शाखा नंदुरबार येथे मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली त्यानंतर मालमत्ता या बँकेकडे तारण नसल्याचे भासवुन तत्कालीन सर्व दुय्यम निंबधक, नंदुरबार, तत्कालीन सर्व तलाठी नंदुरबार यांच्याशी संगनमत करुन बेकायदेशीरपणे इतरांना विक्री करुन 4 कोटी 59 लाख बँकेत न भरता फसवणुक केल्याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडीयाचे शाखाधिकारी भटुसिंग शामसिंग ठाकुर यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रविंद्र काशिराम मराठे, सुरेखा रविंद्र मराठे दोन्ही रा – महाराष्ट्र व्यायाम शाळा, नंदुरबार, तत्कालीन सर्व दुय्यम निंबधक नंदुरबार व तत्कालीन सर्व तलाठी नंदुरबार यांच्या विरुद्ध भादवी कलम 420, 406, 467, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि रविंद्र कळमकर करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे