आपल खान्देशक्रिडा व मनोरंजन
सोनल पानपाटील यांची अखिल भारतीय महिला बॉल बॅडमिंटन संघात निवड
सोनल पानपाटील यांची अखिल भारतीय महिला बॉल बॅडमिंटन संघात निवड
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर येथील संत मुक्तबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सोनल पानपाटील या विद्यार्थीनीची चेन्नई येथे १८ फेब्रुवारी २०२२ ते २१ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय महीला बॉल बॅडमिंटन संघासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल विद्याभारती शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, सचिव डॉ. अशोक चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील व क्रीडा संचालक प्रा. डॉ. विरेंद्र जाधव, प्रा. डॉ. रमेश शेवाळे यांनी अभिनंदन केले आहे.




