गुन्हेगारीविदर्भ

धक्कादायक : न्यूड व्हायरल करण्याची धमकी देत १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

मलकापूर शहरातील 30 वर्षीय नराधमाच्या धमक्यांना बळीपडून वेळोवेळी त्या 15 वर्षीय मुलीच्या अब्रूचे लचके तोडण्याचे कू कृत्य भूषण बोरसे या नराधमाने केले. वेळोवळी होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडीतेने सर्व हकीकत आपल्या घरी सांगितली

बुलडाणा – मलकापूर शहरातून चीड आणणारी घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीला आपल्याच गल्लीतील 2 मुलींच्या मदतीने फसवून तिचे अश्लील फोटो काढत, ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोलिसांनी नराधम भूषण बोरसे व त्याला मदत करणाऱ्या 2 मुलीना अटक केली आहे.

नराधम भूषण बोरसे याने गल्लीतीलच 2 मुलींच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढले आणि हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल किंवा तुझ्या आई बाबांना दाखवेल अश्या प्रकारे ब्लॅकमेल करून त्या मुलीला वाटेल तिथे बोलावून घेत तिच्यावर बळजबरीने अनेकदा बलात्कार केला

दरम्यान मलकापूर शहरातील 30 वर्षीय नराधमाच्या धमक्यांना बळीपडून वेळोवेळी त्या 15 वर्षीय मुलीच्या अब्रूचे लचके तोडण्याचे कू कृत्य भूषण बोरसे या नराधमाने केले. वेळोवळी होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडीतेने सर्व हकीकत आपल्या घरी सांगितली. पीडितेच्या आई-वडीलांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले.पोलीसांनी आरोपींना अटक केली असून विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे, पुढील तपास API स्मिता म्हसाळे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे