आपल खान्देश
आर पी आय तालुका पाचोरा सचिव प्रदिप चौधरी यांचा राजीनामा..
आर पी आय तालुका पाचोरा सचिव प्रदिप तुळशीराम चौधरी यांनी आर पी आय सचिव पदाचा दिला राजीनामा
मा: आर पी आय उ’ महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांनी 2/4/2020 मध्ये पाचोरा तालुका सचिव म्हणून प्रदीप तुळशीराम चौधरी यांची नियुक्ती केली!त्याप्रमाणे त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले
ते म्हणाले की आर पी आय पक्षामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून तसेच पदाधिकारी म्हणून माझी कामगिरी चोख पार पाडली, आपल्या पक्षात आपला सहवास लाभला तसेच आपल्या कडून खूप काही शिकण्यास मिळाले.परंतु आता मला आपल्या पक्षात (संघटनेत) वेळ देणे मला शक्य होत नसल्यामुळे माझ्या कौटुंबिक कामकाजामुळे आता मला वेळ देणे शक्य नाही .म्हणून मी लेखी स्वरुपात राजीनामा देत आहे! , आपल्या पक्षाच्या विचार व आपली कामगिरी माझ्या साठी विस्मरणीय राहील .
मी कुठल्याही दबावाखाली अथवा कुठला ही लोभ न बाळगता माझा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे! तरी कृपया आपण मला आपल्या पदावरून तसेच पक्षा च्या सदस्यत्व या कार्यातून मुक्त करावे ही विनंती.



