Published by Nilesh Patil
जळगाव : कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण अनुभवलेच आहेत. या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा प्रशासनाला आधी १३ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असून दुसर्या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. याच्या मदतीने आपण तिसर्या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत. रूग्णसेवेच्या बळकटीकरणासाठी या रूग्णवाहिका महत्वाची भूमिका पार पाडतील; असा आशावाद पालकमंत्री यांनी व्यक्त केला
जिल्हा रूग्णालयाच्या आवारात १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकांना चालकांना चावी देऊन हस्तांतरीत करण्यात आल्या.
जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रूग्णवाहिकांचे अलीकडेत लोकार्पण करण्यात आले असून त्या रूग्णवाहिका रूग्णसेवेत रूजू झाल्या होत्या. यानंतर आज जिल्हा प्रशासनाला दुसर्या टप्प्यात १२ रूग्णवाहिका प्राप्त झाल्या असून आज जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात याचे लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि अँब्युलन्स चालकांना चावी प्रदान करून याचे लोकार्पण केले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा