आपल खान्देश

पाकिस्तानमधील वादळाचा पाचोरा व भडगाव तालुक्याला फटका; हवेत पसरले धुळीचे कण!

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा (प्रतिनिधी) पाकिस्तानमधील  धुळीच्या वादळाचा  राज्याच्या वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. सकाळपासून मुंबई आणि इतर शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे.

हवेमध्ये धुळीचे कण मिसळले आहेत. त्यात काल आणि आज अनेक भागात पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते. ते आता राजस्थान  आणि गुजरात  दिशेने सरकत आहे. त्यामुळेच वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे. या धुक्याच्या वादळाचा प्रभाव पाचोरा व भडगाव तालुक्यात दिसून आला. महामार्गांसह अनेक रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पहावयास मिळाले.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे