आपल खान्देशकृषीवार्ता

पारोळा व एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान उर्वरित सर्कलला मिळणेसाठी आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा

जळगाव एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान उर्वरित सर्कलला मिळणेसाठी आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा – आमदार चिमणराव पाटील

 प्रतिनिधी

एरंडोल/पारोळा – माहे सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२१ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. असे असतांना माझ्या मतदारसंघातील एरंडोल तालुक्यातील फक्त एकाच सर्कलला अतिवृष्टीचे अनुदान मंजूर झाले असून उर्वरित ३ सर्कलला अनुदान मंजूर नाही. तसेच पारोळा तालुक्यातील दोन सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आले असून उर्वरित ३ सर्कलला अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही.

तसेच संपूर्ण एरंडोल व पारोळा तालुक्यात नुकसान झालेले असतांना व पंचनामे झालेले असूनही उर्वरित पारोळा तालुक्यातील तीन व एरंडोल तालुक्यातील तीन सर्कलला अनुदान मंजूर नसल्यामुळे तसेच दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अनुदान मिळणेबाबत सातत्याने मागणी होत आहे. यास्तव उर्वरित सर्कल मधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्याबाबत आपल्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात यावी व उर्वरित सर्कलला तातडीने अनुदान मंजूर होणेसाठी योग्य तो निर्णय व्हावा अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे साहेब, मदत व पुनर्वसनमंत्री विजयजी वडेट्टीवार साहेब, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कडे २३ मार्च २०२२ रोजी पत्रान्वये केलेली होती. याचा सातत्याने पाठपुरावा आमदार मा.आबासाहेब चिमणराव पाटील हे संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी करीत होते. आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या योग्य पाठपुराव्याला व प्रयत्नांना यश आले असून उपरोक्त मागणीची मा.मंत्री महोदयांनी दखल घेत एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळण्यासंदर्भात तातडीचे बैठक आज दि.२६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता मुंबई येथे मा.मदत व पुनर्वसन मंत्री महोदयांच्या दालनात मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.विजयजी वडेट्टीवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब व आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन, प्रधान सचिव, कृषी, विभागीय आयुक्त, नाशिक, जिल्हाधिकारी, जळगांव, जिल्हा कृषि अधिकारी, जळगांव यांचे समवेत घेण्यात आली. या बैठकीत एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा व एरंडोल तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान उर्वरित सर्कलला मिळण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे