महाराष्ट्र

जमीन नांगरताना शेतकऱ्याला सापडला प्राचीन मंदिरचा मुकूट

दिगंबर माळी यांना हा मुकूट जमिनीत दिसला. त्यानंतर हा मुकूट बाहेर काढण्यात आला. दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मुकुटाची पाहणी केली त्यांच्या माहितीनुसार ते 2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मुकूट असल्याचे सांगितले.

दोंडाईचा (धुळे जिल्हा ) सध्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेती मशागतीला वेग आला आहे शेतात नांगरणी करणे, रोटा व्हिटर फिरवणे ईत्यादी प्रकारची मशागती करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. धुळ्यातील रामी (ता. शिंदखेडा) येथील रामा वेडू माळी यांच्या मालकीच्या शेतात मशागत करताना प्राचीन मुकूट सापडला.

हा मुकूट पंचधातूचा असून दोन हजार वर्ष जुना असल्याची माहिती समोर आली आहे. दिगंबर माळी यांना हा मुकूट जमिनीत दिसला. त्यानंतर हा मुकूट बाहेर काढण्यात आला. दोंडाईचा येथील जैन बांधवांनी मुकुटाची पाहणी केली त्यांच्या माहितीनुसार ते 2000 वर्षापूर्वीचा पंचधातू मुकूट असल्याचे सांगितले.

मुकुट सापडल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ दखल घेत मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री यांच्यामार्फत पुरातत्व विभागाला कळविण्यासाठी पंचनामा करण्यात आला.

____________     advertising  ___________

मुकुटाचा पंचनामा करून तो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. सदर माहिती पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे