आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

शिक्षक आमदाराच्या संस्थेच्या चौकशीचे आदेश, फ्री प्रेस ऑनलाईन न्यूजच्या तक्रारीवरून कारवाई

शिक्षक आमदाराच्या संस्थेच्या चौकशीचे आदेश, फ्री प्रेस ऑनलाईन न्यूजच्या तक्रारीवरून कारवाई

 

पनवेल -कोकण शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदार म्हणून निवडून आलेला बाळाराम पाटील शिक्षकांच्याच उपासमारीला कारणीभूत ठरला.

पनवेलमधील दत्तूशेठ पाटील शिक्षण संस्था या स्वतःच्याच संस्थेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या बाळाराम पाटलाने अनेक कर्मचाऱ्यांना हक्काचा पगार देण्यातही हयगय केली. त्यांच्या नेमणूकांमधे घोटाळा केला. शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी नको ती कामं करण्याची वेळ आली तरी हा माणूस बधला नाही. याशिवाय या लबाड शिक्षण संस्थेने बेकायदेशीर पद्धतीने शाळांच्या मान्यता घेऊन शासनाची दिशाभूल करीत 20% अनुदानही लाटले आहे ते वेगळेच.

शिक्षक कर्मचाऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात आम्ही आवाज उठवून, या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. कोरोनाचे निमित्त करून कारवाईसाठी चालढकल करणाऱ्या शिक्षण विभागाने सहा महिन्यांनी अखेर या आमदाराच्या संस्थेच्या चौकशीचे आदेश काढले आहेत. एवढा सगळा प्रकार झाल्यावर बाळाराम पाटलाने आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. शिक्षक बांधवांनी या बाबीची दखल घेऊन पुढच्या वेळी लबाड राजकारण्यांना मत देताना सावध रहावे.

लवकरच शिक्षण विभाग या सर्व प्रकाराच्या मुळाशी जाऊन कारवाई करेल अशी अपेक्षा ठेवू ( नाही केली तर आम्ही करायला लावु) अशा ठाम निर्धार पत्रकार श्री. रमेश नामदेव देवरूखकर यांनी केला आहे.

 


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे