आपल खान्देश

पुरात वाहून गेलेल्या वारसांना नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत आर्थिक मदत वाटप.

वारसांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

पाचोरा(प्रतिनिधी)- सततच्या पावसामुळे तसेच घाटावरील सोयगाव बानोटी आदि भागातील नद्यांचे वाहून येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे हिवरा नदीला आलेल्या पुरातून वाट काढत कृष्णापुरी मधील आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या धनराज शिंपी वय ४० हा तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती.

त्याच्या वारसांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी येथील हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात कृष्णापुरी भागातील शिवकॉलनी मधील युवक देवेंद्र धनराज शिंपी वय ४० हा युवक २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातून कृष्णापुरीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतांना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना घडली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे