आपल खान्देश
लखीमपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी करावी ; मनियार बिरादरी चे निदर्शने
लखीमपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी करावी ; मनियार बिरादरी चे निदर्शने
जळगाव । प्रतिनिधी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जळगाव शहरातील विविध राजकीय पक्ष ,सामाजिक संघटना व बिरादरी यांच्यामार्फत लखीमपूर घटनेचा व आसाम राज्यातील घटनेचा धिक्कार करण्यात आला व भर उन्हात बारा ते एक वाजेपर्यंत निदर्शन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व सर्वोच्च न्यायालयाचे मूख्य न्यायाधीश यांना निवेदन देण्यात आले.
निदर्शनामध्ये मुख्य घोषणा
रस्त्यावररून जाणारे चे लक्ष वेधण्यासाठी निदर्शक
योगी सरकार किसान विरोधी, मोदी सरकार किसान विरोधी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करा, अजय मिश्रा यांना अटक झालीच पाहिजे, आसाम सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात येत होत्या.


