गुन्हेगारी

धुळ्यात बलात्काराची धक्कादायक घटना, पीडितेला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत तब्बल 15 वर्ष बलात्कार

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सलग आठ महिने अत्याचार झाल्याची बातमी समोर आली होती. तर धुळ्यात एका विवाहितेवर दोन नराधमांनी तब्बल 15 वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


धुळ्यात एका विवाहितेवर दोन नराधमांनी तब्बल 15 वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडितेवर बलात्कार करतानाचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांनी पीडितेवर तब्बल 15 वर्षे बलात्कार केला. संबंधित घटना उघड झाल्यानंतर धुळ्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडिता गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराला कंटाळली होती. आरोपी पीडितेला लग्नाच्या आधी माहेरी असताना तसेच लग्नानंतर सासरी असताना देखील जबदरस्ती ब्लॅकमेल करत विविध हॉटेलवर नेत. तिथे ते तिच्यासोबत गैरकृत्य करत. त्यांच्या या जाचाने पीडिता अक्षरश: मेटाकुटीला आली होती. त्यांच्यापासून सुरु असलेला छळ असह्य झाल्याने तिने अखेर पोलीस ठाण्यात जाण्याची हिंमत केली. तिच्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा होता. पण तिने धैर्य एकवटून पोलीस ठाण्यात जाण्याचा निश्चय केला. ती धुळ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपल्यासोबत गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराबाबतची माहिती दिली. यावेळी पीडितेची तक्रार ऐकून पोलीसही हैराण झाले. पण पीडितेने इतके वर्ष त्रास सोसायला नको होता. पीडितेने तातडीने पोलिसात तक्रार करायला हवी होती, जेणेकरुन नराधमांना आतापर्यंत योग्य शिक्षाही घोषित झाली असती.

पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलंय?

या प्रकरणातील मुख्य आरोपी नाना भदाणे याने पीडितेवर 2006 साली सर्वात पहिल्यांदा अत्याचार केला होता. धुळ्यातील अवधान येथे एका शाळेचे बांधकाम सुरु होते. त्या ठिकाणी तो पीडितेला घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला. तसेच त्याचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर आरोपी पीडितेला संबंधित व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देवून वारंवार तिच्यावर बलात्कार करु लागला.

या सर्व कामात आरोपीला त्याच्या आणखी एका जोडीदाराने साथ दिली. त्याने देखील पीडितेवर अत्याचार केला. हा सर्व प्रकार 2006 ते 2021 या काळात घडत होता. आरोपींनी आपला व्हिडीओ शेअर केला तर आपली बदनामी होईल, या भीतीने पीडिता इतके दिवस गप्प होती, पण अखेर त्यांचा त्रास असह्य झाल्याने तिने अखेर पोलीस ठाण्याची पायरी चढली, असं पीडिता आपल्या तक्रारीत म्हणाली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे