पाचोरा न पा समितीमार्फत शासनाच्या स्वच्छ शौचालय अॅप विषयी शौचालयांच्या केअरटेकर व नागरिकांना माहिती देताना
पाचोरा (प्रतिनिधी) देशात केंद्रमार्फत “आजादी का अमृत महोत्सव स्वच्छता से सम्पन्नता ” अभियान पाचोरा शहरात राबविण्यात येत आहे, पाचोरा न पा समितीमार्फत केंद्र शासनाच्या स्वच्छ शौचालय अॅप विषयी शौचालयांच्या केअरटेकर व नागरिकांना माहिती देण्यात आली
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्षपुर्ति च्या अनुषंगाने केंद्रमार्फत “आजादी का अमृत महोत्सव स्वच्छता से सम्पन्नता ” अभियान पाचोरा शहरात राबविण्यात येत आहे. त्यातील एक घटक म्हणजे – सार्वजनिक शौचालय सफाई जनभागादारी अमृत दिवस अंतर्गत आज शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी नगर परिषदेमार्फत गठीत समितीमार्फत केंद्र शासनाच्या स्वच्छ शौचालय अॅप विषयी शौचालयांच्या केअरटेकर व नागरिकांना माहिती देण्यात आली व त्यावर प्रतिक्रिया कशी नोंदवायची, हजेरी कशी द्यावयाची इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर अभियान नगर परिषद पाचोरा व ग्रीन इंडिया सर्व्हिस प्रो. ह्यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा