Pachora | पाचोऱ्यातील एका पाणीपुरी व्यवसायीकावर कारवाई विरोधात व अवैध व्यवसाय विरोधात मनसेचे जळगाव अधीक्षक यांना निवेदन..
पाचोरा पोलीस स्टेशन वे निरीक्षक यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्याबाबत जळगाव जिल्हा मनसेचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. असून पोटापाण्यासाठी व्यवसाय करीत असलेल्या तरुणांना कायद्याचा धाक दाखवून कायद्याप्रती भीती निर्माण केली जाते असा आरोप करून सदर मुजोर अधिकाऱ्या आरोप करून सदर घटने विरोधात जळगाव मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आली.
पाचोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शहर सचिव श्रीकृष्ण विठ्ठल दुन्दुले हे आपल्या परिवारासह आदर्श नगर येथे आपल्या वयस्कर आई-वडिलांसोबत राहतात. शहरामध्ये रोजगार उपलब्ध नसल्याने इतर कुठलाही अवैध धंदा न करता, स्वताचा व परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय करतात (ठिकाण: भडगाव रोड पाचोरा) दिनांक १६/०६/२०२४ रोजी रात्री १०:३० ते १०:४५ त्या सुमारास श्रीकृष्णा ढूंदुले यांचे पाणीपुरीचे दुकान चालू असल्याचे आढळले. तेव्हा पवार साहेब त्या दुकानावर गेले व कोणतीही विचारपूस न करता सदर युवकास थेट गाडीत बसवून पोलीस स्टेशन ला घेवून गेले सदर युवकाने मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले असता त्याला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व लगेच बंद केला आणि त्याची दाढी जोरात ओढली आणि त्याला बेदम मारहाण केली.
सदर पोलिसांनी कायद्याचा धाक अशा अवैध धंदा करणाऱ्यांना न दाखवता आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या गरीब होतकरूवर दाखविण्याची बहादुरी सदर अधिकाऱ्याने दाखविली आहे. म्हणजेच ज्यांना कायद्याचा धाक पाहिजे त्यांना स्वताच्या आर्थिक लाभासाठी अभय दिले जाते. आणि एखादा गरजवंत वैध पद्धतीने पोटापाण्यासाठी व्यवसाय करीत असलेल्या तरुणांना कायद्याचा धाक दाखवून कायद्यापती भीती निर्माण केली जाते असा आरोप करून सदर मुजोर अधिकाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर निषेध करून सदर अधिकाऱ्यावर पोलीस प्रसासनाने कारवाई करावी याप्रकरणी मनसे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात त्यांनी पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्यावर कारवाई करावी तसेच शहरातील व तालुक्यातील सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे अन्यथा पिडीत तरूणासह कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही दिला.
यावेळी मनसे नेते मा.आ.अॅड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, अॅड. जमील देशपांडे, मुकुंदा सेठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.



