आपल खान्देश

हिवरा नदीने एका महिन्यात तीन बळी घेतले, पाचोरा नगर पालिका यंत्रणाची वाटाण्याच्या अक्षता…

तीन लोकांचा जीव जाणे याला कोण जबाबदार आहे याची नगर परिषद ने जबाबदारी घेवुन तात्काळ त्या परीवाराला नगर परिषद ने आर्थिक मदत करावी- सचिन सोमवंशी (कॉंग्रेस तालुका अध्यक्ष )


पाचोरा (प्रतिनिधी) – येथील हीवरामाई नदीत कृष्णापुरी भागात जोडणारा नदीचा पुल ऐन पावसाळ्यात तोडल्याने पुलाचे काम झाले नाही मात्र बळी मात्र जात आहे आज पुन्हा एक बळी गेला असल्याने चिंता वाढली आहे

शासनाच्या परीपत्रकानुसार ऐन पावसाळ्यात रस्ते किंवा पुलाची कामे करु नये असे असतांना पाचोरा नगर परिषद च्या हम सो कायदा प्रमाणे शहरातील सर्व मुख्य रस्ते फोडुन ठेवले तर पाचोरा आणि कृष्णापुरी भागाला जोडण्यात येणारा महत्त्वाचा पुल कोणतीही व्यवस्था नकरता नागरिकांना काय त्रास आहे याचा विचार नकरता पुल तोडण्यात आला नागरिकांची ये जा बंद केली आहे यामुळे नागरिकांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जनतेचा उद्रेकाची वाट न. पा प्रशासन बघत आहे असेच वाटत आहे. त्यातच जेथे पुल तोडला त्या ठिकाणी वाहत जाणाऱ्यांना वाचविण्यासाठी दोर कींवा कोणतीच व्यवस्था ठेवली नाही त्यामुळे पाण्यात पडलेला वाचु शकत नाही. आज दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवासी उत्तम पांचाळ यांचा मुलगा साहेबराव पांचाळ याचा नदीकाठी तोल सुटल्याने पाण्यात वाहून गेला उत्तम पोहन्याची शैली असताना देखील तो स्वताला बाहेर निघण्यास अपयशी ठरला. अद्याप सापडलेला नाही यापुर्वी आठ दिवसांपासून शिंपी नामक युवक अद्याप बेपत्ता आहे

तीन लोकांचा जीव जाणे याला कोण जबाबदार आहे याची नगर परिषद ने जबाबदारी घेवुन तात्काळ त्या परीवाराला नगर परिषद ने आर्थिक मदत करावी अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. नगर परिषदेच्या चुकी च्या वेळी कामे केल्याने या परीसरातील ये जा करणार्‍यांना पेट्रोल व डिझेल बरोबर मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असुन यापुढे नगर परिषद असे करु नये हे देखील श्री सोमवंशी यांनी म्हटले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे