पंजाबरावांचा जून 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला; वाचा काय म्हणतायं डख..
झूम मराठी वृत्तसेवा
यंदा राज्यात मान्सूनचे दोन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झाले. यामुळे शेतकरी बांधवांसमवेतच उकाड्याने हैराण झालेली जनता मोठ्या आनंदात बघायला मिळाली. भारतीय हवामान विभागाने दहा तारखेला मान्सून कोकणात दाखल झाल्याचे स्पष्ट केले होते.
दहा तारखेला कोकणात दाखल झालेला मान्सूनने अवघ्या एका दिवसात मुंबई पर्यंतचा पल्ला गाठला. हवामान विभागाने मान्सून काल मुंबईत दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय मान्सूनच्या पुढील प्रवासास पोषक वातावरण असल्याचे देखील सांगितलं आहे. यादरम्यान, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचादेखील जून महिन्यातील मान्सूनचा अंदाज सार्वजनिक झाला आहे.
शेतकरी बांधवांचे देखील पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाकडे लक्ष लागून होते. अखेर काल पंजाबरावांनी 25 जून पर्यंतचा आपला मान्सून अंदाज सार्वजनिक केला आहे.
पंजाबराव डख यांच्या मते 11 जून म्हणजेच कालपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
पंजाबराव यांच्यामते, शेतकरी बांधवांनी जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी केल्यास शेतकरी बांधवांच्या अंगलट येऊ शकते आणि हजारो रुपयांचा नाहक खर्च होऊ शकतो.
याशिवाय पंजाबराव आणि शेतकरी बांधवांना चांगले दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे. विद्यापीठाचे बियाणे वापरल्यास शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले.
निश्चितच पंजाब रावांच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधवात मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळणार आहे. शिवाय आता पेरणीचा टाइम देखील जवळ आला असल्याने आगामी काही दिवसात शेत शिवार बहरलेले दिसणार आहे.




