पाचोरा तालुक्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; अंतुर्लीगावात हळहळ..
शेतकऱ्याचा साप चावल्याने मृत्यू, मुक्या जनावरांना सकाळी चारा पाणी देण्यासाठी वाड्यात शिरलेल्या शेतकऱ्याला विषारी सापाने दंश केला...

- दिलीप परदेशी
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बु|| गावातील तरुण शेतकरी अजय सुरेश पाटिल हे त्यांच्या पाळलेल्या मुक्या जनावरांना आज रविवारी सकाळी चारा पाणी देण्यासाठी वाड्यात गेले आणि तेथेच शिरलेल्या विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू ओढवला गावात तरुण शेतकरी दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक गावातील तरुण शेतकरी अजय सुरेश पाटिल हे नेहमी प्रमाणे गावाशेजारी गोठ्यात त्यांच्या पाळलेल्या मुक्या जनावरांना आज रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास चारा पाणी देण्यासाठी गेला असता काही वेळाने तेथून जाणाऱ्यांना मयत अजय सुरेश पाटिल हे बेशुद्ध अवस्थेत दिसले बघणाऱ्यांनी आरडा ओरडत करत काही आजू बाजूचे लोकं एकत्र झाले आणि बेशुद्ध असलेल्या शेतकऱ्याला तात्काळ पाचोरा शहरातील रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासनी केली असता विषारी सापाने दंश केले असे निदर्शनास आले, पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तरुणकर्ता पुरुषाला विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू ओढवल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत अजय सुरेश पाटिल यांच्या परिवारात आई व पत्नी, दोन मुले होते, ते कष्ट करून शेती कसत होते अंतुर्ली गावातील तरुण शेतकरी दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.




