आपल खान्देशराजकीय

बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांच्या पक्षनिष्ठतेचा जुना व्हिडीओ व्हायरल – कोई माई का लाल…

जळगावमधील शिवसेनेचे आक्रमक नेते, गुलाबराव पाटील सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. पाटील गुवाहाटीमध्ये शिंदेंच्या गटात दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण, शिवसेनेचे आमदार फुटणार काय, या प्रश्नाच्या उत्तरात सुमारे अडीच वर्षांपूर्वी पाटील संतापून म्हणाले होते,  ‘कोई माई का लाल फोड सकता है उनको?’ आता ते बंडखोर शिंदे यांच्यासोबत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. तो नेमका कधीचा आहे, याची मात्र माहिती नाही. व्हिडीओमध्ये पत्रकार हे गुलाबराव पाटील यांना शिवसेनेचे आमदार फुटू शकतात अशी भीती वाटते का? असा प्रश्न विचारतो. याच्या उत्तरात गुलाबराव पाटील म्हणतात, “कोई माई का लाल फोड सकता है उनको (आमदार)? फोडना है तो आ जाए सामने. ये सब्जी मंडी थोडी है के कोई बैंगन लेके जाए, कोई भरता लेके जाए…  हिंमत है तो आ के ले जाए.” आज ते शिंदेंसोबत आहेत.


Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. झूम मराठीच्या टीम अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व झूम मराठी स्वीकारत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे