आपल खान्देशब्रेकिंग

धक्कादायक -व्हिडीओ – पाचोऱ्यात तीन मजली इमारत कोसळली :जीवीत हानी नाही

शहरात आज रात्री १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही

झूम मराठी पाचोरा  – बांधकाम करतांना गेल्या पाच वर्षांपुर्वी काही तांत्रिक दोष राहील्याने शहरातील बाहेरपुरा भागात तीन मजली इमारत कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही

पाचोरा शहरातील व्हीपी रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणुन तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपुर्वी बांधकाम केली होती मात्र या इमारतीच्या पावसाने तडा पडला म्हणून येथे असलेले भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती. रिमझिम चालणाऱ्या पावसाने आज रात्री १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. यापूर्वी नगर परिषद ने हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. इमारत कोसळली चा व्हिडिओ सोशल मीडिया वर जोरात व्हायरल होत आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे