गुन्हेगारी

मला पकडून दाखवल्यास 100 कोटींचं बक्षीस, असं चॅलेंज देणारा ‘लखोबा लोखंडे’ FB पेजचा ऍडमिन अटकेत

‘मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार’ असं चॅलेंज देणाऱ्या लखोबा लोखंडे या फेसबुक पेजचा ऍडमिन असलेल्या अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या.

गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी सांगली येथून शनिवारी त्याला ताब्यात घेतलं.

लिमये याला आज पुणे येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळं फासलं. तसेच त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतलं.

दरम्यान कष्टाने ज्या नेत्यांनी आपली कारकीर्द घडवली त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अशाच प्रकारे समाचार घेणार, असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे