संजय पवारवच्या फराळाला खमंग राजकीय फोडणी
नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्याचे माजी आमदार भाजपेयी असलेले संजय पवार यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात राष्ट्रवादी गर्दी जमल्यामुळे नांदगाव तालुक्यात वेगळीच राजकीय खमंग चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचे आमदार की मिळालेले संजय पवार यांनी एकदा जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले त्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले खरे मात्र सध्या ते भारतीय जनता पार्टीच्या तंबूत आहेत. अर्थात त्यांचे पालकमंत्री भुजबळ यांच्याशी असलेली सध्या लपून राहिलेले नाही. अशा सार्या पार्श्वभूमीवर संजय पवार यांनी दीपावलीच्या निमित्ताने फराळ आणि संगीत रजनी आयोजित केली त्यांच्या रसिक अस्वादा पेक्षा खमंग अधिक राजकीय चर्चा रंगली आहे. संजय पवारांच्या फराळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदगाव तालुका पदाधिकारी त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी आडवा हात मारला.
कार्यक्रमात संगीत रजनी चागलीच रंगत आली असताना दुनियादारी चित्रपटातील टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात हे गाणे कलाकारांनी म्हणायला सुरवात केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. एकमेकांचे लक्ष घड्याळाकडे पाहत भविष्यातील काही टिप्पण्या ही चांदनी केल्या.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील, माजी आमदार अनिल दादा आहेर, नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, बबलू पाटील, दिनकर यमगर, चेतन पाटील, ऍड गंगाधर बिडगर, देविदास उगले, विनोद शेलार, वाल्मीक खेडेकर, दत्तू पवार, बाळासाहेब साठे, दीपक खैरनार, आदींसह विविध पक्षातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार संजय पवार व सुरज पवार यांनी स्वागत केले.
फराळास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती राहिल्याने माजी आमदार संजय पवार यांच्या त्यादृष्टीने भविष्यात राष्ट्रवादीकडे कल आहे की काय त्याची खमंग चर्चा मात्र संपूर्ण नांदगाव तालुक्यात रंगली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा