महाराष्ट्रराजकीय
“राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!”, विनायक राऊतांचं मोदींना पत्र
शरण खन्ना
मुंबई | शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर संताप व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणा केली असून त्याचे पडसाद आता दिसू लागले आहेत. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यातच नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असे पत्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
केन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे को तत्काल हटाने के सम्बन्ध में @narendramodi @PMOIndia : pic.twitter.com/1ok0N1rJ4k
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) August 24, 2021
मोदींना राणेंच्या हकालपट्टीची पत्र
विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पदावरून काढण्यात यावे अशी मागणी आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, केंद्रीय मंत्रिमंडळाला मंत्री नारायण राणे यांना हटवण्याची विनंती केली. नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.
जाहिराती





