गुन्हेगारी

‘विनयभंगाला’ही लाज आणली या महिलांनी…! विनयभंगाची खोटी तक्रार व पंधरा लाखाची खंडणी मागणार्‍या माजी उपसरपंच, मानवाधिकार संघटनेच्या महिलांसह ९ जणांवर गुन्हा दाखल..!

झूम मराठी पुणे

चाकण येथील नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास भाग पाडणाऱ्या माजी उपसरपंच महिलेसह व एका पत्रकार असून नऊ जणांवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात चाकणचे नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी यांच्या फिर्यादीवरून माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, कुणाल राऊत यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये चाकण मधील एका पत्रकाराचाही समावेश आहे.

नगरसेवक शेवकरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील नऊ जणांनी सलोनी नावाच्या महिलेस विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास सांगितले आणि तिला वारंवार पोलिस ठाण्यात शेतकरी यांच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी पाठवले.

दरम्यानच्या काळात प्रकरण मिटविण्यासाठी पंधरा लाखाची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती पाच लाख रुपये आणि सलोनी या महिलेच्या वैद्यकीय उपचारासाठी मागणी करण्यात आली. या दरम्यान नगरसेवक शेवकरी यांच्याकडे मागणी करताना सीसीटीव्ही कॅमेरात संबंधित महिला दिसत असून पैशाच्या मागणीचे व्हाट्सअप वरील चॅटिंग देखील पोलिसांना मिळाले आहे.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रकाश राठोड, फौजदार विजय जगदाळे पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे