ब्रेकिंग

मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, राजावाडी रुग्णालयात पीडितेचा मृत्यू

सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

मुंबई : सैतानालाही लाजवेल अशा अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. पण ज्या अमानुष पद्धतीनं तिच्यावर अत्याचार झाले होते त्याचं वर्णनही करता येणार नाही. अतिरक्तस्त्राव झाल्यानं पीडितेची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. आज सकाळी तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं कळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आज रुग्णालयात तिच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.

पीडितेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ती व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापौर पेडणेकरांनी दिली होती. पण तिचा अखेर मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील एक नराधम गजागाड असून यात आणखी काहींचा समावेश होता का याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यामुळे आता आरोपीविरोधात खूनाच्या गुन्ह्याचीही नोंद केली जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे