आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
अनुदासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचा जाहीर पाठिंबा
अघोषित शिक्षक महासंघाच्या बेमुदत धरणे/उपोषण आंदोलनास व शिक्षक समन्वय संघाच्या प्रचलित प्रमाणे अनुदासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचा जाहीर पाठिंबा
राज्याध्यक्षा शुभांगी ताई पाटील यांचा पदाधिकाऱ्यांसह सक्रीय सहभाग
मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यातील अघोषित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक तुकड्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी स्थापनाकरण्यात आलेल्या अघोषित शिक्षक महासंघाच्या बेमुदत धरणेआंदोलनास काल महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने जाहीर पाठींबा दिला.

तसेच प्रचलित प्रमाणे अनुदानासाठी स्थापन करण्यात आलेल्या समन्वय संघाच्या आंदोलनास ही सक्रिय सहभाग व पाठिबा दिला
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा मा सौ शुभांगी ताई पाटील,राज्य उपाध्यक्ष विवेक पाटील सर आदी पदाधिकारी यांनी दोन्ही महासंघ्याच्या समन्वयक यांना पाठिंबा पत्र दिले.
या प्रसंगी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी सांगितले की , सर्व विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक हे खरेतर प्रचिलीत प्रमाणे अनुदान घेण्यास हकदार आहेत, तसेच अघोषित च्या शिक्षकांना न्याय मिळावा या साठी मी सुरवातीपासून लढत आहे व शेवटच्या अघोषित शिक्षकाला न्याय मिळवून देई पर्यंत मी त्यांच्या सोबत असेल असा निर्धार व्यक्त केला.




