आपल खान्देश
राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आज पाचोरा भडगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या गा्वांना भेट देवून पाहणी केली.
झूम मराठी पाचोरा (प्रतिनिधी) सोमवारी रात्री पाचोरा – भडगाव शहरासह तालुक्यात कजगाव, नगरदेवळा, परिसरातील गावांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे,घरांचे,रस्त्याचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले ढगफुटी सदृश परिस्थिती होवून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या पुराचे पाणी नदी काठावरील गावांमध्ये व घरांमध्ये शिरले. त्यामुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आज पाचोरा भडगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या गा्वांना भेट देवून पाहणी केली.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील कजगाव,नगरदेवळा, परिसरातील गावांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे ,घरांचे,रस्त्याचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहे या नुकसानीची पाहणी करताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ सोबत भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील,कार्याध्यक्ष हर्षल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील,कजगाव सरपंच दिनेश पाटील,अशोक राजपूत,अशोक सोनवणे,कोमल दादा पाटील,पंकज गढरी,दिनेश राजपूत,पृथ्वीराज पाटील,दीपक पाटील,दादाभाऊ पाटील,संदीप पाटील, संदीप चव्हाण,परेश पाटील,कुणाल पाटील,संग्राम पाटील,पत्रकार प्रमोद ललवाणी,नितीन सोनार,प्रमोद पवार व आदी गावकरी उपस्थित होते.




