गुन्हेगारी

लिव्ह इन रिलेशनशिपची तिला चटकच लागली, मात्र एक प्रियकर ‘ असा ‘ भेटला की..

प्रेमप्रकरणातून आपली आधीच्या प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक घटना नालासोपारा इथे उघडकीस आली आहे.

प्रियकराचा रोजगार गेला म्हणून तो गावाकडे गेल्याने प्रेयसीने दुसऱ्याशी सूत जुळवल्याचा राग मनात ठेवून हा प्रकार घडल्याचे समजते. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून पुढील तपास तुळींज पोलीस करत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ज्योती गौतम असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणीचं नाव असून तर अविनाश कुमार असं अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे. नालासोपारा पूर्वेतील आचोळे नगर येथील साडी कंपाऊंडमधील रहिवासी असणाऱ्या मृत ज्योती आणि आरोपी अविनाश याचं मागील काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. आरोपी अविनाश हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता मात्र कोरोना प्रादुर्भावात त्याच्या हातचे काम निघून गेल्याने तो बेरोजगार झाला.

कोरोना काळात बेरोजगार झाल्यानंतर आरोपी अविनाश आपल्या मुळ गावी उत्तर प्रदेशात गेला. त्यानंतर मृत ज्योतीचे नालासोपाऱ्यातील दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि ती आपल्या दुसऱ्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून तिने आपल्याला दगा देत दुसऱ्याशी सूत जुळवल्याचा अविनाश याला राग आला. तो उत्तरप्रदेशातून नालासोपाऱ्यात आला पण ज्योतीने त्याचे घर सोडून दुसरीकडे घरोबा केला असल्याने घराला कुलूप होते.

अविनाश यांच्याकडे घराची चावी असल्याने तो तिथेच राहिला आणि दरम्यान त्याने ज्योती हिच्या नवीन घराचा पत्ता शोधून काढला. यानंतर रविवारी वेळ पाहून आरोपी ज्योतीच्या घरी गेला आणि तिची गळा आवळून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी प्रियकरालाही ताब्यात घेतलं. याप्रकरणी पोलीस आरोपीची चौकशी करत असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे