आपल खान्देश
धनगर पोटजातीत विवाह होणे काळाची गरज- बापु शिंदे
“धनगर पोटजातीत विवाह होणे काळाची गरज” कुसुंबा येथील धनगर समाजाच पंचमंंडळीच्या बैठकीत सर्वानुमते काढला.
झूम मराठी कुंसुबा (धुळे). पोटजातीच्या सामाजीक आणि राजकीय गरजा भागविण्यासाठी पोटजातीच्या ऐकीकरणाची नितांत गरज आहे.

धनगर समाजातील पोटजाती ऐकीकरणासाठी रोटी बेटी व्यवहार करणे हे सामाजिक द्रुष्टीने गरजेच आहे, यासाठी चळवळीतील तसेच समाजातील पुढार्यांनी पुढाकार घेण गरजेच आहे .असा ऐकमुखी सुर दि.४ रोजी कुसुंबा येथील धनगर समाजाच पंचमंंडळीच्या बैठकीत सर्वानुमते काढला.
कुसुंबा जि.धुळे येथे धनगर समाजाच्या नवनिर्वाचीत पंच मंडळीची बैठक नुकतीच संपन्न झाली, यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे, उ.महा.धनगर महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी पंचकमिटीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी
*धनगर पोटजातीचे ऐकीकरण काळाची गरज*
सध्या मुल मुली उच्च शिक्षण घेत आहे. त्यांना अपेक्षित स्थळ मिळत नाही. त्या़च्या अपेक्षा वाढल्या आहेत तर त्या उलट परिस्थिती पहाता शेतकरी मुलांसाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे,
अनेक मुलांनी लग्नाच्या वयाची मर्यादा ओल़ा़्ंडली आहे. त्यांचे पालक हताश झाले आहे.
संभाव्य परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशा वेळी अंतरजाती विवाह कडे वळत आहे.
जर खरच राज्यातीलच नव्हे तर देशातील समाज ऐकसंघ करायचा असेल तर आपणही इतर समाजाचा आदर्श घेऊन, धनगर समाजातीच्या पोटजातीच्या भिंती मोडल्या पाहिजे, रक्ताचे नाते ऐक केले पाहिजे, यासाठी समाजातील प्रतिष्ठीत लोका़नी पुढाकार घेतला पाहिजे,
याविषयी सर्वानुमते ठराव मांडण्यात आला.
यावेळी नवर्निवाचीत पंचप्रमुख श्री.छबीलाल परदेशी, उपाध्यक्ष श्री.नारायण परदेशी, सचिव श्री.दिपक परदेशी, डॉ.श्री.दत्ता परदेशी, श्री.प्रदिप (सर) परदेशी, श्री.रतन परदेशी, श्री.दत्तात्रय परदेशी,श्रीमती जिजाताई परदेशी, श्री.सुरेंन्द्र परदेशी, श्री.जगदिश (छोटू) सुर्यवंशी, या पंचकमेटी व माजी पंच प्रमुख श्री.महादु आबा परदेशी, कवी निंबा धनगर, श्री.लुकडू महादु परदेशी,श्री.बुटा दादा, ग्राम.सदस्य राजू पहेलवान, गोटन परदेशी, युवा नेता मुकेश धनगर यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी तरुण मंडळी ,समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.



