आपल खान्देश

माहिती अधिकार दिवस साजरा करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने पाचोऱ्यात दिले निवेदन..

पाचोरा (झूम मराठी) येत्या 28 सप्टेंबर रोजी अंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा. यासाठी पाचोरा प्रांतधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात 28 सप्टेंबर रोजी अंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश या पुर्वी ही दिले आहेत. परंतु त्या आदेशाचे अंमलबजावणी प्रशासन कडून फक्त कागदावरच केली जात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या संघटन मधील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते व  सामाजिक कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर माहितीचा अधिकार व जनतेस सर्व कायद्याद्वारे प्राप्त अधिकार संबंधित कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार करत असतात.

महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय – केंमाअ – 2008/प्र. क्र. 378/08/ सहा. दिनांक – 20/9/2008. या शासन निर्णयानुसार “28 सप्टेंबर ” हा दिवस आंतरराष्ट्रीय “माहिती अधिकार दिवस” म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला होता. या दिवशी स्पर्धा, निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच व्याख्यानमाला ” माहितीचा अधिकार ” या विषयावर उपक्रम घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम आयोजित करावेत तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करून ” माहिती अधिकार दिवस ” म्हणून साजरा करावा ही निवेदन देऊन मागणी करण्यात आली. याप्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य मुरलीधर परदेशी, पंकज पाटील, भुषण वानखेडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

Zoom जाहिराती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे