आपल खान्देशब्रेकिंग

दुर्देवी ! जळगावात विजेच्या धक्क्याने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

झूम मराठी जळगाव । जळगावातील निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडीत एका ६ वर्षीय बालकाचा एसीच्या कॉम्प्रेसरमधील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. केशव ललित चव्हाण (वय ६) असे या मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने मातेने एकच आक्रोश केला.

याबाबत असे की, आई दिव्या या दुपारी तीन वाजता गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता मुलगा केशवदेखील त्यांच्या मागे गेला. आई कपडे काढत असताना खेळतानाच त्याचा एसीच्या कॉम्प्रेसरला धक्का लागला. त्यात वीजप्रवाह असल्याने केशव जागेवरच कोसळला.

घाबरलेल्या दिव्या यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरकडे नेले, मात्र तेथे पोहोचण्याच्या आतच आईच्या मांडीवर त्याची प्राणज्योत मालवली. दिव्या व ललित यांना केशव हा एकुलता एक मुलगा होता. चव्हाण कुटुंब मूळचे वनोली, ता. यावल येथील रहिवासी आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे