आपल खान्देश

कोकणच्या धर्तीवर मदत मिळावी, यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न- खा उन्मेष भैय्या पाटील

भडगाव – तालुक्यातील कजगाव, पासर्डी, घुसर्डी, भोरटेक , तांदळवाडी, उंबरखेड यासह परिसरात मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे करताना एकही अतिवृष्टीग्रस्त वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने स्थानिक सरपंच, कार्यकर्त्यांची मदत घेऊन प्रत्येक क्षतिग्रस्त नागरिकांचे नुकसानीचे पंचनामे करावे. कोकणच्या धर्तीवर मदत मिळावी. यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न सुरू असून पंचनामा झाला नाही म्हणुन भरपाई पासुन कोणी वंचित राहू नये. यासाठी घटनानिष्ठ पंचनामे करावेत असे आदेश वजा सूचना प्रशासनाला केल्या.

कोकणच्या धर्तीवर मदत मिळावी. यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न सुरू असून पंचनामा झाला नाही म्हणुन भरपाई पासुन कोणी वंचित राहू नये. यासाठी घटनानिष्ठ पंचनामे करावेत असे आदेश वजा सूचना प्रशासनाला केल्या.

खासदार -उन्मेष पाटील 

 भडगाव तालुक्यातील नुकसानीचा आढावा बैठकीत केले. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या आदेशाने आज तहसिल कार्यालयात अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे बाबत महसूल आणि कृषि विभागाकडून सूरू असलेल्या कार्यवाही बाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. आज खासदार उन्मेशदादा पाटील यांनी संबधित यंत्रणेला फक्त नदीकिनारी असलेल्या नुकसानग्रस्त यांच्या सोबत संततधार पावसामुळे गावात नुकसान झाले असेल तर त्याचा देखील पंचनामा करावा. कुंभार ,चांभार असो वा लोहार यासारख्या लहान मोठे व्यावसायिक विविध आस्थापना या नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. याकडे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी अनेक नुकसान ग्रस्त नागरीक यांनी आपली कैफियत मांडली. बैठकीला तहसीलदार मुकेश हिवाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपट तात्या भोळे, भाजपा महीला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील,गटविकास अधिकारी जी ए वाघ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अतूल पाटील, तालुका कृषी अधिकारी बी बी गोरडे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा पत्रकार सोमनाथ पाटील, पाचोरा भाजपा अध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, वैद्यकिय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. संजय पाटील, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष विनोद हिरे, माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितिन महाजन, विनोद पाटील, प्रवीण पाटील, पत्रकार अशोक परदेशी, पत्रकार नरेन्द्र पाटील, पत्रकार संघटनेचे सुधाकर पाटील, जावेद शेख, भाजपा सोशल मीडिया प्रमुख शुभम सुराणा, भाजपा कार्यालय प्रमुख कुणाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे