भडगाव तालुक्यातील शिक्षण महर्षी प्रताप हरी पाटील भाजपात दाखल..
भाजपचे अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षात जोरदार स्वागत केले.
अखेर सहकारी नेते प्रतापनाना पाटील आपला पक्ष सोडून भाजपात. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील शिक्षण महर्षी म्हणून ओळख असलेले प्रताप हरी पाटील यांनी बुधवारी त्यांची लेक पूनम पाटील आणि समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षात जोरदार स्वागत केले.
पाचोरा- भडगाव विधानसभा क्षेत्रात शिक्षण क्षेत्रासह, सहकारातील ज्येष्ठ नेते प्रताप नाना पाटील व त्यांच्या कन्या जिल्हा दूध संघाच्या संचालिका तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ पूनम पाटील यांनी राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे, आमदार मंगेशदादा चव्हाण,आमदार विक्रांत पाटील,आमदार चित्राताई वाघ माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,भाजपा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून आपल्या राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. प्रताप नाना पाटील यांचा पाचोरा- भडगाव मतदार संघात असलेला लोक संपर्क बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा नक्कीच फायदा होईल त्यात शंका नाही.
माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी आणि आता प्रताप पाटील यांचा प्रवेश करून भारतीय जनता पार्टीने पाचोरा- भडगाव विधानसभेत मोठी ताकद तसेच विरोधकांना आव्हान निर्माण केले आहे. पाचोरा- भडगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता पक्ष वाढीसाठी आखलेली रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.
आगामी काळात देखील मतदारसंघातील काही मोठे चेहरे भारतीय जनता पार्टीत येण्याची शक्यता असल्याचे चर्चिली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या प्रवेशा प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



